फलटण - सार्वजानिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती/जमाव एकत्रित येणे यावर बंदी असताना देखील कोणतेही ठोस कारण नसताना पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवुन संपुर्ण जगभरात कोरोना (कोव्हीड-19) या संसर्गजन्य विषाणुने थैमान घातलेले असताना कोरोना विषाणु सारख्या भयंकर आजाराच्या वाढत्या प्रसारास कारणीभुत ठरेल तसेच इतर नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी कृती करीत असताना करुन मा.जिल्हाधिकारी सो.पुणे यांचे आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी बारामती तालुक्यात शिराष्णे येथे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक प्रक्रीये वेळेस बांउन्सर वापर केल्या मुळे वडगांव निंबाळकर पोलिसांनी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे गु.र.नं.66/2021आपत्ती व्यवस्थापन अधिनियम वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अविनाश कोंडीबा मोरे वय-36 रा.सांगवी ता.फलटण जि.सातारा वहीद जहांगींर झारी वय-25, 3) शुभम अशोक शिंदे वय- 25 वर्षे, अविनाश बापु लोंढे वय- 29 वर्षे, सागर बलभिम इंगळे वय-25 वर्षे, वरील अ.क्र 2 ते 5 सर्व रा.बारामती जि.पुणे अहमद पठाण (पुर्ण नाव सांगितलेले नाही) आण्णा गोसावी (पुर्ण नाव सांगितलेले नाही) विक्रम जाधव (पुर्ण नाव सांगितलेले नाही) अ.क्र.6 ते 8 रा.फलटण जि.सातारा गणेश खुटवड वय- रा.शिरष्णे ता.बारामती जि.पुणे समीर पटेल रा.इंदापुर जि.पुणे अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत याबाबत पोलिस कर्मचारी हिरालाल खोमणे यांनी फिर्याद दिली.काही वर गुन्हा दाखल केला आहे पण असाच सर्व प्रकार फलटण तालुक्या मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया च्या वेळी बाऊन्संर आणले होते असा प्रकार फलटण तालुक्यात गेले कित्येक दिवस निवडणूक चालू झाल्या पासून सर्व नियम मोडत हा प्रकार फलटण तालुक्यात सुरू आहे पण या कडे कोणीच लक्ष दिले नाही पण बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन ची दमदार कामगीरी या ठिकाणी पाहयाला मिळाली आहे फलटण तालुक्यातील बांउन्सर वापरनारा या कडे कोणीच लक्ष दिले नाही सांगवी ता फलटण येथे मतदान निवडणूक प्रकीया चालू असताना देखील हा सर्व प्रकार सागंवी गावा मध्ये सुरू होता सर्वत्र सोशल मिडीया द्वारे फोटो सह विडीओ सुध्दा दहशत दाखवन्यासाठी सोशल मिडीयाद्वारे वायरल केले असताना देखील बाउन्सर वापर करणारा वरती कारवाई झाली नाही पण बारामती मध्ये कारवाई होते या मुळे सांगवी सह फलटण तालुक्यातील नागरीक विचार करण्यास पडले आहेत नागरीकांची एकच चर्चा बारामती तालुक्यात गुन्हा दाखल होतो तर फलटण मध्ये असा गुन्हा दाखल होणार का या कडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियम भंग करणाऱ्यांवर बारामती तालुक्यात कडक कारवाई .फलटण मध्ये कारवाई होणार ?
विशेष प्रतिनीधी:-
