जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या एमआरजीएस कामामध्ये घरकुल लाभार्थी वृक्ष लागवड वृक्ष संगोपन इत्यादी कामे केली जातात या कामासाठी पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत सूनगाव येथे अनिल कोथळकर रोजगासेवक नियुक्त आहे परंतु रोजगार सेवक हा अनेक लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहेत व कामाबाबत होणारे मस्टर काढण्यास विलंब करत आहे व सदर लाभार्थ्यांना घरकुल संबंधित व वृक्षलागवड संबंधित असलेल्या मजुरांचे आधार कार्ड पेंडिंग ठेवत आहे आहेत व त्याबाबत मस्टर काढण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत दिरंगाई करत आहे व मजुरांना काहीही करून घ्या अशा प्रकारची धमकी देत आहे. तसेच रोजगार सेवक मजुरांना तसेच घरकुल लाभार्थ्यांना साहेबांना पैसे द्यावे लागतात त्या करिता पैशाची मागणी करीत असतो तरी या बाबतची तक्रार ग्रामपंचायत ला एमआरजीएस अंतर्गत कामे करणाऱ्या महिला मजुरांनी दिलेली आहे या तक्रारीवर शारदा बोबडे, विमल शेषराव धुळे, यमुना कातोरे, द्रौपदी गजानन ढगे या महिला मजुरांच्या सह्या आहे व घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर कागदपत्रे वेळेवर रोजगार सेवक पंचायत समिती येथे लाभार्थ्याच्या कागदांची पूर्तता करीत नाही तसेच पूर्ण मजुरांचे कागदपत्रे देऊनही त्यातील दोन ना तीन लोकांचेच मजुरीचे पैसे येतात त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल लाभार्थी तसेच वनमजूर रोजगार सेवकाला फोन करतात परंतु रोजगार सेवक यांचे फोन उचलत नाही. त्यामुळे घरकुल अनुदान मिळण्यास विलंब होत आहे व घरकुल लाभार्थी यांना मस्टर काढण्यास पैशाची मागणी रोजगार सेवक करीत आहे याबाबतचा त्रास सुनगाव येथील घरकुल लाभार्थी लक्ष्मण मिसाळ बंडू भड व एकनाथ गवई यांच्यासह बहुसंख्य नागरिकांना होत आहे. तरी वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन या गंभीर बाबीची व तक्रारीची दखल घेऊन ग्रामपंचायत व पंचायत समिती जळगाव जामोद येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी व अशा कामचुकार रोजगार सेवकांवर कारवाई करून दुसऱ्या रोजगार सेवकांची नियुक्ती सूनगाव येथे करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
सुनगाव येथील रोजगार सेवकाने दिली एमआरजीएस.अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना धमकी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.
