पहिली शेतकरी आत्महत्या साहेबराव करपेंसह सम्पूर्ण कुटुबाला जळगाव जामोद येथे एल्गार संघटनेने श्रद्धांजली वाहत दिले निवेदन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

दिनांक १९ मार्च रोजी एल्गार संघटनेच्या वतीने देशातील पहिली आत्महत्या ठरलेल्या साहेबराव करपे व कुटुंबाला जळगाव जामोद येथील शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात मागच्या १८ दिवसांपासून एल्गार संघटनेच्या वतीने पिक वीम्या संदर्भात दिल्या गेलेल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करत पिकवीमा मंजूर करण्यात यावा. तसेच ३५ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ ला चिखलगव्हान जिल्हा यवतमाळ यांनी आपल्या पत्नी व चार मुलांसह प्रशासनाच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केली.ही देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. तब्बल ३५ वर्षानंतर देखील शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या मानगुटिवर बसून शेतकऱ्यांना आत्महत्तेस प्रवृत्त करितच आहे. शेतकऱ्यांना आजच्या आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर पिकवीमा मंजूर करण्यात यावा व सक्तिची विजबिल वसूली तात्काळ थांबवन्यात यावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन एल्गार संघटनेच्या वतीने करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहिल असे नमूद आहे. निवेदन देतेवेळी राजू पाटिल अवचार,रमेश बानाईत,अजहर देशमुख,बळीराम मानकर,आशिष वायझोड़े,संजय देशमुख,अविनाश गावंडे,भरतसिंह सोनोने, सुनिल तायड़े,दगड़ू गवई,श्रीराम मिसाळ,भैय्याबाप्पू देशमुख, मुजहिर मौलाना, निजाम राज आदि उपस्थित होते.

Previous Post Next Post