प्रामाणिकपणा अद्यापही जीवंत.प्रवीण ठाकरे यांनी हरवलेले पॉकेट केले परत...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख 

दिनांक १९ मार्च २०२१ रोजी खामगाव येथील स्थानिक किसान नगर येथील रहिवासी श्री प्रवीण अशोकराव ठाकरे यांनी सापडलेले पॉकेट अतिमहत्वाच्या कागद पत्रासह शिवाजी नगर पोलिसांच्या वतीने सदर इसमास परत करून या कलियुगात सुद्धा प्रामाणिकपणा अद्यापही जीवंत आहे. याचेच उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे.मलागौडा बालागौडा पाटील वय ३७ वर्ष कर्नाटक हल्ली मुक्काम रायगड कॉलनी खामगाव यांचे पॉकेट टॉवर चौक परिसरात हरवले होते. त्यामध्ये स्टेट बँक, एचडी.एफ.सी बँक, कॉर्पोरेशन बँक, कर्नाटक बँक सह आणखी बँकेचे एटीएम कार्ड, आधार कार्ड कंपनीचे ओळखपत्र यासह महत्वाचे कागद पत्र व काही पैसे होते. दरम्यान किसान नगर भागातील प्रवीण ठाकरे हे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी येथे कार्यरत असून कामानिमित्याने टॉवर चौक येथे गेले असता त्यांना उपरोक्त पॉकेट सापडून आले त्यामुळे ठाकरे यांनी ओळख पत्रावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पाहिला मात्र फोन बंद दाखवत होता.परिणामी सोशियल मीडियावर पोस्ट केली आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे सापडलेले पॉकेट जमा केले.तेथील पोलीस उपनिरीक्षक श्री.बबनराव कटारे यांनी तप्तरता दाखवत लगेच तपासाची सूत्रे हलवत १२ तासातच पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना आज शिवाजी नगर पो. स्टे. ला बोलावून खातर जमा करून सदर पॉकेट स्वाधीन केले. यावेळी पाटील यांनी ठाकरे व कटारे  यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post