मनाई आदेश असतानाही शेगावात भरला आठवडी बाजार.दुकान उचलण्यासाठी आलेल्या न प कर्मचाऱ्याला घातला घेराव..


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

 जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश असताना सुद्धा शेगाव येथील आज मंगळवार 16 मार्च रोजी दुपारनंतर आठवडी बाजार भरला भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती शेगाव शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्य कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढू नये  या उद्देशानेे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांनी एका आदेशान्वये जिल्ह्यामध्ये कुठेही आठवडी बाजार भरण्यास बंदी घातली आहे शेगाव नगरपालिकेकडून शहरात भोंगा फिरवून तशा प्रकारची सूचना देण्यात सूचना आली मात्र असे असताना सुद्धा आज मंगळवार 16 मार्च रोजी भाजी विक्रेत्यांनी आठवडी बाजार परिसरात दुकाने लावण्याची तयारी केलेली दिसत होती सुरुवातीला पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने आठवडी बाजारात उपस्थित राहून भाजी विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मनाई केली मात्र पोलीस आणि नपा कर्मचारी तेथून हटताच भाजी विक्रेते दुकानदारांनी आपली दुकाने थाटली काही वेळानंतर नगरपालिकेचे दोन ते तीन कर्मचारी यांनी भाजी विक्रेत्यांची दुकाने हटविण्यास प्रारंभ केला असता भाजी विक्रेत्यांनी त्या कर्मचाऱ्यांना घेराव टाकला त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आठवडी बाजारातून निघून गेल्यानंतर आठवडी बाजार परत भरला व भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत होते.

Previous Post Next Post