वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण सांगली कोल्हापूर या भागामध्ये महापुराने थैमान घातले होते त्यामुळे वित्तहानी व जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे यासाठी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज निधी संकलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज वरणगाव शहरामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करण्यात येत आहे शहरातील व्यापारी वर्गाकडून हा निधी जमा केला जात आहे यथाशक्ति हा निधी व्यापाऱ्याकडून घेतला जात असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फंडांमध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक भाऊ मराठे माजी नगरसेवक सुधाकर भाऊ जावळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी माजी नगरसेवक रवी भाऊ सोनवणे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते महेश सोनवणे इफ्तार खा मिर्झा व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निधी संकलन करण्यासाठी उपस्थित होते