वेगवेगळ्या ठिकाणी डोहात बुडून तिघांचा मृत्यू .अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथिल एकाचा समावेश...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी

चिखलदरा पर्यंटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटक युवकांचा जत्रा डोहाच्या डोहात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३:३० वाजता सदर घटना घडली. दोघांचे मृतदेह डोहाबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी आणले आहे. दोघेही आपल्या एकूण ९ मित्रासह १५ आॅगष्ट निमित्त चिखलदरा येथे फिरायला आले होते. तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथिल आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथिल इसमाचा बुडून मृत्यू झाला. शेख इकरम शेख हूसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७) अकोट फैल अकोला अशी मृतांची नावे आहेत.एम एच ३० ए झेड ४६२६ व एम एच ०४ एफ एफ ४१२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नऊ मित्र आले. चिखलदरा पर्यंटन स्थळावरील विविध पाॅइन्टसच्या दिल्यानंतर सर्व मित्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत जत्रा डोह पाॅईट आहे. येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे. तरी सुद्धा पर्यंटक उतरतात. रविवारी सुध्दा सुध्दा मित्र एकमेकांच्या अंगावर पाणी जात असताना काही खोल पाण्यात उतरल्याने दोघे बूडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांनी RC24newsला बोलताना सांगितले पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएस आय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशिष वरघट, रितेश देशमुख सहकारी करीत आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

*खटकाली डोहात एकाचा मृत्यू*

दुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोपटखेड खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. हरिश जानराव काळमेघ ३८ रा. चौसाळा तालुका अंजनगाव असे मृताचे नाव आहे. शनिवारी आंघोळीसाठी डोहात उतरले असता बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृत्यदेह रविवार काढण्यात आला पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश देशमुख, प्रभाकर चव्हाण, रायबा जावरकर करीत आहे.

Previous Post Next Post