जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने महिनाभरापासून दडी मारली आहे ,हातातोंडाशी आलेली पिके करपून चालली आहे ,म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज वरणगाव येथील शंभू महादेवाच्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक घालून पावसासाठी साकडे घातले आहे.एक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतात आलेले कपाशी तूर उडीद मूग इत्यादी पिके करपून चालले आहेत म्हणून भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शंभू महादेवाला पावसासाठी साकडे घातले आहे समजून महादेवाच्या पिंडीवर ती पाण्याचा व दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय आरती करून महादेवाला साकडे घातले की बाबा लवकरात लवकर पाऊस पडू दे व बळीराजाचे संकट कळू दे अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.प्रतिभाताई तावडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रंजना ताई पाटील शहराध्यक्ष अरूणाबाई इंगळे माजी नगराध्यक्ष रोहिणी ताई जावळे माजी नगरसेविका प्रतिभा चैधरी माजी नगरसेविका वैशाली मराठे प्रतिभा सोनवणे निर्मला शेळके सौ उषा तावडे श्रद्धा दिलीप गायकवाड या महिला उपस्थित होत्या
पावसासाठी महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शंभू महादेवाला घातले साकडे, दुधाचा पाण्याचा अभिषेक करून केली शंभूची आरती...
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ
