प्रबोधन समिती व नलुभारत प्रतिष्ठानने केला १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

 नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात हिवरखेड मधून सर्वोच्च गुण घेणाऱ्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती व नलुभारत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. हिवरखेड मधून कु.रुपल संदिप वालचाळे (९९.४०),कुणाल गणेश इंगळे (९९.२०),कु.अनुश्री गोवर्धन गावंडे (९८.४०),कु.उत्कर्षा सुभाष बोळे (९६.६०) व कु.रुचिका विनायक गोमासे (९६.२०) या पाच विध्यार्थ्यांनी सर्वोच्च गुण मिळविल्याबद्दल संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती व नलुभारत प्रतिष्ठानच्या वतीने  पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर हिवरखेडचे उपसरपंच तथा संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे कार्यकर्ते रमेश दुतोंडे यांच्या तर्फे या विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीच्या वतीने रमेश दुतोंडे, महेंद्र कराळे,दिलीप बाळापुरे, उमेश तिडके यांनी तर नलुभारत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.प्रशांत इंगळे,राजेंद्र तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यापासून अपेक्षा व्यक्त केल्या.गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.प्रशांत इंगळे यांच्या दवाखान्यात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अनिल कराळे,महेंद्र भोपळे, बाळासाहेब भोपळे,रामेश्वर शिंगणे,राजेश टाले,नंदकिशोर शिंदपुरे,श्रीकांत परनाटे,सचिन दही,शैलेंद्र भोपळे ,जगतकुमार व्यवहारे,किशोर वानखडे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक हजर होते.कार्यक्रमाचे संचालन विलास घुंगड यांनी तर आभार प्रदर्शन मनिष गोरद यांनी केले.

Previous Post Next Post