विपरीत परिस्थितीतील यश कौतुकास्पद -अनिल जयस्वाल दी.न्यू इरा महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार..


 जळगाव जामोद प्रतिनिधी: -  

कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण व नवीन मूल्यमापन पद्धती या विपरीत परिस्थितीत  विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे   कौतुकास्पद व मनोबल वाढविणारे   असल्याचे  प्रतिपादन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी दि. ५ ऑगस्टला   स्थानिक दि. न्यु. इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात  आयोजित  गुणगौरव समारंभाला उपस्थित विद्यार्थी  व पालक यांना मार्गदर्शन करताना केले  .दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक ५ ऑगस्टला  नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात  प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी व त्यांचे   पालक यांचा सत्काराचे आयोजन  कनिष्ठ   महाविद्यालयाने  केले होते. या कार्यक्रमाच्या    अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल  जयस्वाल  होते तर या कार्यक्रमाला सचिव अनुप पुराणिक, संचालक तथा प्राचार्य अविनाश कुलकर्णी ,उपप्राचार्य शेख सलीम,  पर्यवेक्षक ओमप्रकाश चांडक व परीक्षा विभागाचे प्रमुख सुनील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.    कार्यक्रमाचा प्रास्ताविकातून प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी  विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे त्यांच्या इयत्ता दहावी, अकरावी व बारावी चा सातत्यपूर्ण गुणवत्तेवर आधारित असल्याचे  सांगून  यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी मुल्यमापनाकरीता शिक्षकांनी केलेले प्रयत्न  तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार संस्था  गुणवत्ता  व मूल्य जपत करीत असलेल्या प्रगतीची माहिती उपस्थितांना दिली  . जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण कौतुकास्पद असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमात विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या मेघा रामभाऊ बोडखे ९७.८४ टक्के गुण, द्वितीय गौरव विजय कपले ९५.३३टक्के गुण व तृतीय मयूरी चंद्रशेखर दोड ९५ टक्के गुण प्राजक्ता लक्ष्मण मिसाळ ९५ टक्के गुण व प्रतिक घनश्याम  राठी ९५ टक्के गुण त्याचबरोबर कला शाखेतून प्रथम आलेली सानिका रमेश बानाईत ९७.३३टक्के गुण द्वितीय   कोमल श्रीकृष्ण सरदार ९४.६७ टक्के गुण व तृतीय आलेला तुषार राजू तायडे ९३.६७ टक्के गुण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा   त्यांच्या पालकांसह  संस्थेचे अध्यक्ष  ,सचिव, प्राचार्य व उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला व त्यांनि  मिळवलेल्या यशाचे  कौतुक केले . यावेळी मेघा रामभाऊ बोडखे  ,सानिका रमेश बाणाईत,कोमल श्रीकृष्ण सरदार  व तुषार राजू तायडे यांनी  लॉकडाउनचा कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी घेतलेले ऑनलाईन वर्ग व केलेले मार्गदर्शन याचा विशेष  उल्लेख केला तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकांचा सत्कार केल्याने संस्थेचे आभार मानले  . कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक निळकंठ राठोड यांनी केले  .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक ,शिक्षिका   व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post