हिवरखेड तेल्हारा मार्गावर बस अडकली,प्रवाशांनी साकारली ,दे धक्का चित्रपटाची भूमिका...


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड तेल्हारा मार्गावर मोठं मोठे खड्डे झाले असून हा मार्ग पूर्णपणे धोकादायक झाला आहे, या मार्गाच्या कडे आमदार,खासदार,बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष असल्याने हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे, दिनांक २९ सप्टेंबरच्या दुपारी या मार्गावर ९५१४ क्रमांकाची बस मोठ्या खड्ड्यात जाऊन फसल्याने या बस मधील प्रवाशी ,विद्यार्थी यांना बराच वेळ नाहक त्रास सहन करावा लागला तर काही वेळ ट्राफिक सुद्धा जाम झाला होता,  शेवटी प्रवाशांना ही बस काढण्यासाठी खाली उतरून ,दे धक्का चित्रपटाची भूमिका साकारावी लागली,  या रस्त्यावर दगड उचला की खड्डा आढळून येतो अशी परिस्थिती या हिवरखेड तेल्हारा मार्गाची झाली आहे, हा रस्ता दुरुस्त व्हावा या करिता मोठं मोठे आंदोलने व उपोषने सुद्धा केली जात असून मात्र कुंभकरनि झोपेचे प्रशाश्ननाणे घेतलेले हे सोग नागरिकाच्या जीवाशी खेडत आहे, हा मार्ग असाच राहिला तर या रस्त्यावर मोठं मोठे अपघात होऊ शकतात, थोडयाशा पावसानेच हा रस्ता सपूर्ण चिखलमय होतो ,अनेक मोटरसायकली या रस्त्यावर चालताना पावसात घसरतात, अनेकांच्या तर गाळ्या फसतात , हा मार्ग तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी त्रस्त प्रवाशी करीत आहेत,

Previous Post Next Post