दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी "उमेद-महाराष्ट्र राज्य जिवोन्नती अभियान" आणि "कृषीविज्ञान केंद्र जळगांव जामोद"यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत मतापालक मेळावा,स्तनदा आणि गरोदर माता मेळावा आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ शितलताई वानखडे सरपंच वडशिंगी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून-प्रा श्यामसुंदर बोर्डे विषय तज्ञ कृषिविज्ञान केंद्र जळगांव,पवार सर मुख्याध्यापक हायस्कूल वडशिंगी,गोमासे मॅडम मुख्याध्यापिका प्राथमिक शाळा वडशिंगी,श्री धोटे साहेब ग्रामसेवक वडशिंगी,श्री वकिलखा महेबूबखा अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती,सौ रुपाली ताई माटे प्रभाग संघ अध्यक्ष,श्री विनोद शेगोकार BMM,श्री सुबोध खोब्रागडे CC,सौ सत्यभामा वाघ प्रभाग संघ सचिव,सौ मालू ताई दाते कोषाध्यक्ष,सौ शालिनीताई वानखडे CTC कॉन्व्हर्जन्स इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने झाली.कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद चे विषय तज्ञ प्रा.श्यामसुंदर बोर्डे सर यांनी पोषक आहार म्हणजे काय,परसबाग लागवड कशी करावी,परसबागेचे महत्व,सकस आणि पोषक आहाराचे महत्व याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.महिलांनी शेतीला पूरक असे गृहोद्योग सुरू करून स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा विकास करावा असे आवाहन केले. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र आपल्याला सर्वोतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहे असे सांगितले.तसेच धोटे साहेब,गोमासे मॅडम,भटकर सर यांनीसुद्धा सर्वांना पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरूपात स्तनदा माता आणि गरोदर माता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आणि शेवटी सर्व मतापालक,स्तनदा माता,गरोदर माता यांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भटकर सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री विनोद शेगोकार यांनी आणि आभारप्रदर्शन सौ शालिनीताई वानखडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधिका हुजरे CRP,संगीता पुंडे कृषिसखी,सौ सुनीता येणकर मॅडम,सौ वैशाली हिस्सल मॅडम,सोळंके सर,भटकर सर,आणि सर्व ग्रामसंघ पदाधिकारी उमेद यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात मातापालक,स्तनदा माता,गरोदर माता,उमेद-महाराष्ट्र राज्य जीवोन्नती अभियान ग्रामसंघ वडशिंगी चे सर्व पदाधिकारी,बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे "राष्ट्रीय पोषण माह" उत्साहात संपन्न...
जळगांव जामोद ता.प्रतिनिधी:-