हजारो कामगारांची उपस्थिती-बांधकाम कामगार संघटनेचे धरणे आंदोलन !!


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-सुरज देशमुख RC24 न्युज 

बांधकाम कामगार व ईतर असंघटित मजूर संघ जिल्हा बुलढाणा च्या वतीने दि.२२ आकटोम्बर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले असून प्रशासनाने बांधकाम कामगारांच्या मागण्या लक्षात घेत मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा भरातील बांधकाम कामगार या धरणे आंदोलनात सहभागी झालेत.प्रशासनाच्या विरोधात मैदानात उतरून कामगारांच्या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलन छेडण्याचा ईशारा सुद्धा यावेळी बोलतांना बांधकाम कामगारांचे नेते प्रशांत मेश्राम विनोद जपसरे मनोज बाविस्कर मक सुद भाई यांनी दिला.दिनांक २२ आकटोम्बर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हाभरातील बांधकाम कामगार दाखल झाले. प्रशासनाला निवेदन देत आपला निषेध नोंदवला. गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम कामगारांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.अशातच संघटनेने अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने धरणे आंदोलनाचे तीव्र हत्यार संघटनेने उपसले असून हे राज्यभर तीव्र करण्यात येणार आहे.जिल्हाभरात अनेक बांधकाम कामगारांच्या नोंदी रखडल्या असून ते विविध योजनांपासून वंचित राहत आहेत.असे असले तरी बांधकाम कामगार नोंदणी करिता कामगाराला ग्रामपंचायत,नगरपालिका,नगरपरिषद यांचे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.शहरी भागात नगरपालिका, नगरपरिषद मधील अधिकारी वर्ग कामगारांना सदर प्रमाणपत्र देत असतांना जिल्ह्यातील काही ग्रामसेवक हे सदर प्रमाणपत्र देण्यास नकार देत असल्यांने कामगार भरडला जात आहे.याकडे व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन हा लढा उभारन्यात आला असून हा लढा राज्यभर उभारल्या जाईल, बांधकाम कामगारांनी आपल्या न्यायहक्का करिता संघटनेच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होत आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन जिल्हा सचिव मो नसीम यांनी केले आहे.संघटनेच्या माध्यमातून एकूण सात मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले असून बांधकाम कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास आंदोलन तीव्र  करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.या निवेदनावर गौतम उबाळे राजू गवई दीपक जाधव बुलढाणा जिल्हाध्यक्ष नितीन वाकोडे,जिल्हा सचिव मो नसीम व रघुनाथ पाटील प्रवीण पानझडे सुरज बोरसे सरलेश  वानखेडे प्रकाश मोरे गणेश मोरे  असलंम भाई इकबाल भाई  चोपडे रफिक भाईइतरांच्या स्वाक्षरी आहेत.या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, पालकमंत्री,इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई,कामगार आयुक्त नागपूर यांच्यासह अनेकांना पाठवण्यात आल्या आहेत.

Previous Post Next Post