गेला अनेक दिवसापासून महाराष्ट्रासह देशातील सर्व शाळा विद्यालय महाविद्यालय कोरोनामुळे बंद होती मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून मागील काही दिवसात शाळा चालू करण्यात आल्या असुन सोशल डिस्टंट ,मास्क लावणे, तसेच संस्थांकडून सॅनिटायझर चा वापर करून व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश देण्यात येते आहे.असे असलेतरी हिवरखेड येथील स्वस्तिक ग्रुप व गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने हिवरखेड येथील सरस्वती विद्यामंदिर येथे वर्ग ५ते७च्या २००विध्यार्थाना मोफत मास्क वाटण्यात आले असुन हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळाना पुढील काही दिवसात मास्क वाटप करण्याचा त्याचा मानस आहे याआदि ही स्वस्तिक ग्रुप गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत यावेळी संत गजानन महाराज मंदिराचे व्यवस्थापक मनिष भुडके,सरस्वती विद्या मंदिराचे सचिव सतीश भाऊ राऊत,संजय मानके, नानाभाऊ पोटे ,मनोज राठी ,सरस्वती विद्या मंदिराचे प्राचार्य अमोल भोगाळे शिक्षक वृद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
स्वस्तिक ग्रुपच्या वतीने भव्य मास्क वाटप...
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.