माजीमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगांव जामोद या मतदार संघातील सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेले जामोद गाव हे गाव आमदार महोदयांचा राजकीय गड.या ठिकाणी दिनांक १६ डिसेंबर रोजी राजकीय भुकंप झाला. भाजपच्या लोकनियुक्त सरपंच असलेल्या गंगुबाई पुंडलिक दामधर यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे दिनांक १६ डिसेंबर रोजी झालेल्या काँग्रेस मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या यशोमतीताई ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलगा समाधान पुंडलिक दामधर सह ३०० कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार कृष्णराव इंगळे,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश पाटील, जयश्री शेळके, रामविजय बुरुंगले यांच्या उपस्थितीत कॉग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. जामोद येथे कोट्यावधी रूपयांचे विकास कामे खेचुन आणणारे जळगांव जामोद तालुक्यात विकासाभिमुख, तेजतर्रार चेहरा असलेले उच्चशिक्षित समाधान दामधर यांच्या कॉग्रेस प्रवेशाने भाजपचा बालेकिल्ला राजकीय गड असणारा जामोद, सुनगांव परिसर कॉग्रेसमय होणार आहे. जामोद गावामध्ये केलेल्या विविध विकास कामांमुळे जसे की सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, व्यायाम शाळा, अभ्यासिका, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व वेळोवेळी विकास कामांना होणारा विरोध यामुळे समाधान पुंडलिक दामधर हे सर्वाच्या परिचयाचे आहेत.समाधान दामधर यांनी आपला मुत्सद्दीपणा व सर्वच विषयांच्या ज्ञानामुळे तसेच प्रत्येक कामाची धडपड यातुन आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या भाजपाला रामराम ठोकल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती ची जामोद सर्कलची समिकरणे बिघडतील हे नक्कीच. जामोद सर्कलच्या विद्यमान भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई काळपांडे यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे जामोद सर्कल ला यावेळेस काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य झाल्यास नवल वाटू नये. भाजपला उच्चशिक्षित व निर्णय क्षमता असलेले कार्यकर्ते नको आहेत अशा चर्चा लोकांमध्ये चर्चिल्या जात होत्या. जामोद गावच्या लोकनियुक्त सरपंच गंगुबाई पुंडलिक दामधर व समाधान पुंडलिक दामधर यांच्या काँग्रेस प्रवेशाने या सरकारमध्ये काँग्रेसचा दबदबा वाढणार हे मात्र नक्की. या प्रवेशांचा भाजप वर काय परिणाम होतो येणारा काळच सांगेल.
जामोद येथील भाजपच्या लोकनियुक्त सरपंच गंगुबाई दामधर यांचा ३०० कार्यकर्त्यांसह कॉग्रेस मध्ये प्रवेश...
जळगांव जा.प्रतिनिधी:-