भोपळे विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा-2021 मध्ये गुणवत्ता यादीत...


 हिवरखेड प्रतिनिधी :- प्रशांत भोपळे.

नुकताच जाहीर झालेला पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 च्या गुणवत्ता यादीतील निकालांमध्ये सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बाजी मारुन नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे. शालेय स्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेत   इयत्ता पाचवी मधून चि. क्रिष्णा मोहन राऊत (ग्रामीण सर्वसाधारण J-74/156), कु. गौरी चंद्रशेखर ताळे (ग्रामीण सर्वसाधारण J-116/156) तसेच इयत्ता आठवी मधून कु. अंजली राजेश टाले (राष्ट्रीय ग्रामीण E-4/10),  कु. तृप्ती रवींद्र बाजारे (ग्रामीण सर्वसाधारण J-5 156),  चि. यश संतोष आकोटे (ग्रामीण सर्वसाधारण J-6/156), कु. भाग्यश्री नरेश निमकर्डे (ग्रामीण सर्वसाधारण J-8/ 156) या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीतील आपले स्थान निश्चित करून आपले नाव शाळेच्या इतिहासाच्या उंच शिखरावर कोरले आहे.त्यांच्या या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्था, हिवरखेड चे संस्थापक मा. श्री दादासाहेब भोपळे, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिलकुमारजी भोपळे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री पुखराजजी राठी, संस्थेचे सहकार्यवाह मा. श्री श्यामशीलजी भोपळे तथा सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. र.मो. वालोकार मॅडम व सर्व शिक्षक- शिक्षिका, कर्मचारी वृंद ,सर्व सन्माननीय  पालक वर्ग यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Previous Post Next Post