जळगाव जामोद येथे दिनांक एक जानेवारी रोजी माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांच्या अभिनव कल्पकतेतून जळगाव जामोद शहराच्या सर्वांगिन विकास साधन्याच्या माध्यमातून जळगाव जामोद नगर व परिसरातील महिलांकरिता आरोग्याच्या महत्त्वपूर्ण अशा एक कोटी 66 लक्ष रुपये किमती चा महिला जिम व योग आहवाल या वास्तूंच्या भव्य लोकार्पण सोहळा आज माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे. सदर या लोकार्पण सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्षा सीमा डोबे, सौ अपर्णा कुटे संचालिका श्री कोटेक्स, स्वाती केला सीएमडी केला अँड छोरीया सहकार विद्या मंदिर, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार, अनुपमा माळपांडे संचालिका स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ, अनिता जयस्वाल माजी नगराध्यक्ष, उज्वला पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी, वंदना कांडलकर लोकमत सखी मंच अध्यक्ष,श्रीमती स्नेहा टापरे मुख्याध्यापिका आदिवासी आश्रम शाळा, रमाबेन पलन संस्थापक अध्यक्ष गुजराती महिला मंडळ, यांची विशेष उपस्थिती तर सदर लोकार्पण सोहळ्यास मांगीलाल भंसाली सभापती आरोग्य समिती, सविता कपले सभापती बांधकाम, सविता खवणे सभापती पाणीपुरवठा, उषा धंदर सभापती महिला व बालकल्याण, आशिष सारसर सभापती नियोजन, नलुताई भाकरे नगरसेविका, पार्वती कोथळकर नगरसेविका, रत्नप्रभा खिरोडकर, नगरसेवक शैलेंद्र बोराडे, नगरसेवक निलेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदर या वास्तुमुळे परिसरातील महिलांचे आरोग्य चांगले राहील.
जळगाव जामोद शहरातील महिलांकरिता एक कोटी 66 लक्ष रुपये किमतीच्या महिला जिम योगा हॉल या वास्तूंचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-