पेट्रोलचे पैसे न देता गाडी पळून नेली जलंब पो.स्टेशन हद्दीतील घटना घटना सीसीटीव्ही मध्ये कैद...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख 

जलंब स्वीफ्ट कारमध्ये पेट्रोल भरुन पेट्रोलचे पैसे न देताच गाडी घेवून पळून गेल्याची घटना काल रात्री ७.१५ दरम्यान खामगाव नांदुरा रोडवर घनश्याम ऑटो सर्व्हिस आमसरी येथील पेट्रोपंपावर घडली. या प्रकरणी स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून दिसून आलेले कार नंबर ची तपासणी केली असता सदर नंबर हे एके ट्रॅक्टरचे असल्याचे समजले. यामुळे कर सुद्धा चोरीची असल्याचे समजते...संदीप प्रल्हाद ठाकरे वय ३९ रा.सुजातपुर याने शेंगाव तालुक्यातील जलंब पोस्टेला तक्रार दिली की, मी पेट्रोल पंपावर काम करतो काल रात्री मारोती स्वीफ्ट क्रमांकयुपी १३ ए २९८३ ही पेट्रोल पंपावर आली व त्यामधील चालक व काही अनोळखी इसम होते. चालकाने टाकी फुल करण्याची सांगितल्यावरुन गाडीमध्ये ३८ लिटर पेट्रोल भरले (४२०१ रुपये) कार चालकाने पैसे न देताच गाडी घेवून पळून गेला. अश्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी कार चालकाविरुध्द कलम ४०६ भादंवीचा गुन्हा दाखल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे सदर प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून दिसून आलेले कार नंबर ची तपासणी केली असता सदर नंबर हे एके ट्रॅक्टरचे असल्याचे समजले. यामुळे कर सुद्धा चोरीची असल्याचे समजते...

Previous Post Next Post