दि.३ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करून तसेच बालिका दिनाचे आयोजन करून केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गावच्या सरपंच सौ शितलताई वानखडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखा मेहबूबखा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभाताई गोमासे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकिलखा महेबूबखा,मुख्याध्यापिका सौ.शोभाताई गोमासे ,वडशिंगी सरपंच सौ. शितलताई वानखडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सोबतच वर्ग१ते४ च्या विद्यार्थिनी साठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.यात प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट वेशभूषा असणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक श्री सोळंके सर,भटकर सर,शृंगारे सर,येनकर मॅडम,हिस्सल मॅडम आदी तर सोहम आणि प्रज्वल ग्रामसंघाच्या महिला प्रवर्तक सौ. शालिनीताई वानखडे,सौ संगीता पुंडे,सौ वंदना पुंडे,सौ राधिका हुजरे, सामाजिक कार्यकर्ते कैलास भगत,पंकज उमरकर इत्यादिंची उपस्थिती होती.कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी--
जळगांव(जामोद)प्रतिनिधी:-