जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील रहिवासी भूषण गणेश जाधव या 27 वर्षीय तरुणाने दिनांक 19 मार्च रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर असे की भूषण जाधव याचे बी.टेक अग्रिकल्चर चे शिक्षण झालेले असून तो चिखली येथील कोठारी कंपनीत कामाला होता.तो दिनांक 17 मार्च रोजी होळी व धुलिवंदन सणानिमित्त खेर्डा येथील त्याच्या घरी आला होता. परंतु भूषण याने दिनांक 19 मार्च रोजी घरी कोणीही नसताना घरातील स्लॅप च्या लोखंडी कडीला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भूषण यांने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्याचा लहान भाऊ हरीश जाधव व आशिष जाधव यांच्यासह रवींद्र भोपळे यांनी भूषणला खाली घेत प्रवीण वैष्णव यांच्या ऑटोमधून जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय गाठले असता डॉक्टरांनी भूषण जाधव याला मृत घोषित केले. त्यावेळी गावातील प्रवीण भोपळे यांनी भूषण जाधव यांच्या वडिलांना सांगितले की तुमचा मुलगा भूषण याने तुमच्या राहत्या घरातील स्लॅब च्या लोखंडी कडीला दोराच्या सहाय्याने गळफास घेतला आहे व त्यास जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असून त्यांच्यासोबत तुमचे दोन्ही मुले गेलेले आहेत याची माहिती मिळताच गणेश जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयात गेले असता त्यांना भूषण हा मृत झालेला दिसला. अशी फिर्याद भूषण चे वडील गणेश तुळशीराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये दिली परंतु भूषण यांने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. पोलिसांनी मर्ग दाखल करून भूषण याचा देह पोस्टमार्टम करिता देण्यात आला घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.
खेर्डा येथील 27 वर्षीय भूषण जाधव या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...
जळगांव जा.प्रतिनिधी:-