जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदान २० मार्च २०२२ रोजी संपन्न झाले. त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. यावेळी निकाल हाती आला असून १३ पैकी ८ उमेदवारांनी जबरदस्त विजय मिळून विरोधकांचा धोबी पछाड केले आहे. या विजयाची बातमी पसरताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.या सर्व उमेदवारांनी प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविल्याने परिवर्तन पॅनलचा विजय झाला असून.भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस. प्रगती पॅनलचा मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच पिंपळगाव काळे सोसायटी निवडणुकीच्या निकालानंतर आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणू कितही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांची वाजा गाजात मिरवणूक न काढता २१ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.महात्मा ज्योतिबा फुले.गौतम बुद्ध.या सर्वांच्या प्रतिमेला विजयी उमेदवारांनी हार घालून विजयोत्सव साजरा केला.तसेच तेथून गेल्यानंतर दुसरे ठिकाण महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला बाबूसिंग जाधव यांनी हार घालून व सर्वांकडून मोठ्याने विजयाचे नारे देण्यात आले.व शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शालिकराम भोपळे यांनी पूजन व हार घालून तेथे सर्व विजयी उमेदवारांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला व सर्वांना पेढे वाटप करून तोंड गोड करण्यात आले. व तेथेच कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.वासुदेव भोपळे.महादेव घुटे.संतोष गवई वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. गजानन तायडे.सुधाकर घटे. दगडू गवई. राजू पाटील. डॉ.प्रशांत राजपूत .प्रमोद घुटे. श्रीकृष्ण वानखडे. सचिन जाधव.अजय ताठे. गोपाल तायडे. सुनील काकडे. अमरदीप अवचार. मयूर राऊत. लक्ष्मण वाघमारे. गणेश बोदडे. अमित जाधव.सागर जंवजाळ. वसंता मुंडोकार. योगेश जाधव.व युति मधले काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
पिंपळगाव काळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी प्रणित परिवर्तन पॅनल बहुमताने विजयी...
मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी.