दिनांक २३/४/२०२२ ला हिवरखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा यांनी मिळून शाळा पूर्वतयारी मेळाव्या करिता गावातून प्रभातफेरी काढली. प्रभात फेरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध वेशभूषा साकारण्यात आल्या. उत्साहपूर्ण वातावरणात दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मेळाव्याचे उद्घघाटन सौ. नंदाताई मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा पूर्वतयारी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ संगीता ताई केदार ह्या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ लीलाताई रंदे, सौ कल्पनाताई ढोकणे, सौ दिपालीताई मंडवाले , सौ मीनाक्षी ताई मटकर, सौ. सुनीताताई उंबरकार, सौ. रेखाताई उंबरकर, सौ. प्रभाताई खेडकर सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख श्री मनीष गिर्हे सर उपस्थित होते. कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश खिरोडकर सर, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद पोके सर उपस्थित होते. मेळाव्यामध्ये सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ संगीताताई केदार व सर्व पाहुण्यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मेळाव्यातील मुख्य गाभा घटक म्हणून नवोदित विद्यार्थी व माता पालकांचे स्वागत घेण्यात आले. नवोदित विद्यार्थ्यांना माझा प्रवेश निश्चित अशी टोपी घालण्यात आली. फुगे व बिस्किट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. माता पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये केंद्रप्रमुख श्री.मनीष गिर्हे सर यांनी शाळा विकास पत्रातील कृतीपत्रिका शाळेतील पहिले पाऊल या पुस्तकातील माहितीचे सविस्तर मार्गदर्शन व पालकाची भूमिका काय ते समजावून दिले. त्यानंतर शाळापूर्व तयारी आपण करूया चला...... गीता चे सादरीकरण शाळेतील शिक्षिका स्वयंसेविका व विद्यार्थिनी यांनी केले. त्यानंतर नवोदित विद्यार्थ्यांची नोंदणी करून विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता भाषिक क्षमता सामाजिक व भावनिक क्षमता गणन पूर्वतयारी तपासण्यात आली. वजन-उंची घेऊन पालकाच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी करिता व पटनोंदणी करता अंगणवाडी सेविका ताईंचे मोलाचे सहकार्य मिळाले. मेळाव्याला विशेष उपस्थिती म्हणून रतनबाई कानुंगा शाळेचे मुख्याध्यापक श्री श्यामशील भोपळे सर पर्यवेक्षक श्री जगत व्यवहारे सर , सोळंके सर, सरकटे मॅडम धुमाळे मॅडम भड मॅडम उपस्थित होते. शाळा पूर्वतयारी मेळाव्याची पूर्वतयारी सौ. भोपळे मॅडम ,शेटे मॅडम स्वयंसेविका भड मॅडम, भोजने मॅडम, घावट मॅडम यांनी करून घेतली. मेळाव्यातील आकर्षक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .शेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री रेखाते सर , श्री खडसे सर, श्री.गिर्हे सर यांचे सहकार्य लाभले. शेवटी आभार प्रदर्शन श्री गोपाल गिर्हे सर यांनी केले व मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.
जि.प. मराठी प्राथमिक कन्या शाळा हिवरखेड येथे पहिला शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न...
प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
