हतरू येथील 25 आँगष्ट रोजीच्या आंदोलना संबंधी गावकऱ्यांशी वन अधिकारी यांनी केली चर्चा...


सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...

दिनांक 19/08/2022 रोजी हतरू परिक्षेत्र कार्यालय येथे हतरू ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील गावकऱ्यांनी वनविभागाची संबंधित विविध मागण्या जसे जंगलातून जळन फाटा आणणे, नदीतील दगड रेती काढण्यासाठी परवानगी देणे, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी समिती मधील खर्चाची माहिती देणे, निस्तार हक्क मिळावे, चालण्याची गावच्या सिमेपर्यंत परवानगी मिळावी, शेतीसाठी लाईट टाकण्याची परवानगी मिळावी, मेळघाटातील पुनर्वसन प्रथा बंद करावी, हतरु ते सेमाडोह रस्त्याची परवानगी मिळावी तसेच सीमोरी ते सुमिता, चिलाटी ते कुही, सेमाडोह ते माखला रस्ता याविषयी परवानगी मिळावी असे प्रमुख 14 मागण्यांचे निवेदन सादर केले. दिनांक 19 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत के एस पाटील सहाय्यक वनसंरक्षक सिपना वन्यजीवविभाग परतवाडा व ए बी तेलोरे वनपरिक्षेत्र अधिकारी हतरु तसेच हतरू परीक्षेत्रातील कर्मचारी यांनी उपस्थित राहून हतरू येथील गावकऱ्यांशी सदर निवेदनाबाबत चर्चा केली 24 ऑगस्ट 2022 रोजी श्रीमती दिव्या भारती एम उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा व के एस पाटील सहाय्यक वनसंरक्षक वनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा,ए बी तेलोरे वनपरिक्षेत्र अधिकारी हतरू हे संबंधितांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित झाले. तसेच गावकऱ्यांशी चर्चा करून आंदोलन करण्याविषयी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तसेच  दिनांक 25 ऑगस्ट रोजी हतरू कार्यालयासमोर सर्व आंदोलन कर्ते आंदोलन करण्याच्या उद्देशाने गोळा झाले होते.तरी सदर आंदोलन करताना माननीय श्रीमती दिव्या भारती एम उपवन संरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा व के एस पाटील,एस बी तेल्होरे यांनी सदर मागण्यांविषयी जसे सामूहिक वनहक्का बाबत मंजूर सामूहिक क्षेत्रातच मंजुर सामुहिक क्षेत्रातच सामुहिक वनहक्काचा वापर करता येईल तसेच रस्त्यांच्या प्रश्नाविषयी CENTRAL EMPOWERMENT COMMITEE यांचा अहवाल अप्राप्त आहे. तसेच सिमोरी ते सुमिता या रस्त्यांचा संबंधित यंत्रणे कडून कुठलाही प्रस्ताव वनविभागास सादर केला नाही. तसेच मेळघाटातील पुनर्वसन ऐच्छिक स्वरूपाचे असल्याने गावकर्यांच्या इच्छेप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतात इ. संबंधित मागण्याविषयी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. व त्यांच्या शकांचे निरसन करण्यात आले व आंदोलनकर्त्यांनी संबंधित मागण्याविषयी वनविभागाचे स्पष्टीकरण ऐकून आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला यावेळी श्रीमती. दिव्याभारती एम. उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा व मा. श्री. के. एस. पाटील सहाय्यक वनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा, श्री.ए.बी.तेलोरे वनपरिक्षेत्र अधिकारी हतरू, श्री. सोळंके सर नायब तहसीलदार चिखलदरा, श्री. वाढीवे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक चिखलदरा व त्यांचे कर्मचारी, तसेच वनविभागाचे कर्मचारी, हतरु ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post