स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने येथील नगरपरिषदद्वारा घर घर तिरंगा या अभियान अंतर्गत शहरातून ध्वनि क्षेपणाद्वारे तसेच विविध शाळा विद्यालयाच्या माध्यमातुन काढण्यात आलेल्या जनजागृती निमित्ताने शहरातून रॅली व मिरवणुका बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती आदी कार्यक्रम उत्सफुर्तपणे राबविले जात आहे.स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव अभीयाना निमित्ताने नगर परिषदच्या समोर ७५ फूट उंचावर विशाल राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असुन, त्यासाठी ७५ फूट उंचीचा पोल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.घर घर तिरंगा या देशव्यापी अभियान अंतर्गत नागरिकांना नगर परिषदच्या माध्यमातुन विविध आकाराचे राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहीती यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी बुधवारी नगरपरिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना दिली . अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त या मोहिमेत सहभागी होऊन देश प्रेमाची ज्योत जागवावी असे आवाहन मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.
यावल नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानात 75 फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारणार....
शब्बीर खान/यावल (प्रतिनिधी )
