वंचित बहुजन आघाडी जळगांव जामोद चे माजी शहराध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व शहर कार्यकारिणी बरखास्त झाली होती त्या नंतर प्रदेश कार्यकारिणी व जिल्हा अध्यक्ष यांनी जळगांव जामोद शहरातुन इच्छुकांची यादी मागविण्यात आली व त्यानंतर प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी पत्रक काढुन शहर कार्यकारिणी सह शहर अध्यक्ष आजमभाई कुरेशी यांची शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व शहर अध्यक्षा सह २५ पदाधिकारी यांची सुद्धा निवड करण्यात आली . नियुक्ती झाल्यानंतर सर्वच स्तरातून आजमभाई कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये तालुका कार्यकारिणी, जिल्हा पदाधिकारी यांनीही सत्कार केला व शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक स्तरातुन सत्कार करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा जळगांव जामोद येथिल पक्ष कार्यालयात सर्व नवनियुक्त शहर कार्यकारिणी यांचा सत्कार करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा कार्याध्यक्ष रामकृष्ण रजाने, वसंतराव तायडे, शंकरराव इंगळे, अताउल्ला खान,विजय तायडे,पार्वताबाई इंगळे,मुजिब खान, स्वप्निल गवई, संतोष गवई,दिनकर देशमुख,विजय सातव, सुनिल बोदडे, मंगलाताई पारवे,सोनम वानखडे, अर्चना लुलेकर,सुदाम गवई, देविदास वानखडे, प्रल्हाद कोथळकार, राहुल उमरकर, अमोल तायडे,तुळशिराम वंडाळे,आतिकभाई, सुनिल सिरसाठ, भिमराव धुंदाळे, अर्जुन भोसलेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी च्या शहर अध्यक्ष पदि आजमभाई कुरेशी यांची निवड...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
