व्हॉइस ऑफ मीडियाच्या जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी गुलाबराव इंगळे यांची नियुक्ती...

जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-

तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असलेली आणि  पत्रकार आणि पत्रकारितेच्या उत्कर्षासाठी देशातील अग्रगण्य अशा ५० संपादकांनी एकत्र येऊन "व्हाईस ऑफ मीडिया" ही संघटना स्थापन केली. देशातील सतरा राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत असून संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे सह विदर्भ अध्यक्ष अनिल मस्के यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कार्याध्यक्ष अरुण भाऊ जैन लक्ष्मीकांत बगाडे यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या जळगाव (जामोद) तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी गुलाबराव इंगळे यांची निवड केली आहे. ज्येष्ठ संपादकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात ही संघटना कार्यरत असून सार्वजनिक जीवनात पत्रकारिता करताना येणाऱ्या समस्या व अडचणीचे निराकरण ही संघटना करणार आहे ग्रामीण व शहरी भागात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यास ही संघटना कटिबद्ध असेल जिल्ह्यातील पत्रकारांनी संपूर्ण जिल्ह्यात ही संघटना कार्यरत असून तेरा ही तालुक्यामध्ये संघटनेचे तालुकाध्यक्ष जाहीर झाले असून त्यांच्या माध्यमातून लवकरच ११ सदस्यसीय तालुका कार्यकारणी सुद्धा गठीत होणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल असा विश्वास संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post Next Post