दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी जळगाव जामोद शासकीय विश्राम गृह येथे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक यांची जळगाव जामोद तालुका आढावा बैठक झाली...नुकत्याच शिवसेना जिल्हाप्रमुख पदी पुनर्नियुक्ती झालेल्या मा शांताराम जी दाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली तत्पूर्वी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. शिवसेना पक्ष बांधणीवर यावेळी भर देण्यात आला असून आपण सर्व खासदार प्रतापराव जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली मा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या सोबत , शिवसेना भाजपा युतीला समर्थन एकमताने देण्यात आले .दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केलेल्या नरेंद्र खेडेकर हे स्वार्थी व्यक्तिमत्त्व असून ते कधी कोणत्या पक्षात जातील याचा नेम नाही , हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना सोडून जाणाऱ्या आणि काँग्रेस मध्ये १० काढून परत शिवसेनेत येणाऱ्या खेडेकरांनी आम्हला निष्ठा शिकवू नये , खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करण्याची त्यांची लायकी नाही , प्रतापरावांचं बोट धरून ते राजकारणात आले असून ते गद्दार आहेत आम्ही बाळासाहेबांच्या , दिघेनच्या हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहोत अशी जहरी टीका त्यांनी खेडेकर यांच्यावर केली . तसेच तालुका प्रमुख , गणेश वसुले , आणि देवभाऊ उमरकर यांनी भाषणे देऊन पक्षा बद्दल ची आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी तालुका प्रमुम, उप जिल्हा प्रमुख राहुल मारोडे , उप प्रमुख बंदु वाघ , गजानन देशमुख , संजय धुर्डे , रवी बावसकर , अनंता बकाल , अनंता सरोकर , गणेशराव ,संतोष गवळी , विजय पाटील ,चेतन पाटील , प्रमोद शिंबरे , गणेश वसुले , अनुप धुळे , गजानन कापरे , चेतन पाटील , अनंता राजुस्कर , दीपक भाऊ माजरे ,अमोल भगत , गोपाळभाऊ गायकी , अरुण ताडे , प्रभाकर निर्मळ , एन डी पाटील , देवा उमरकर , शिवा भाऊ पाटील , दिपकभाऊ चौधरी , अनंता चरखे ,दीपक माटे , बाळू पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवा उमरकर यांनी केले..!
जळगाव जामोद येथील विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक सेनेची आढावा बैठक संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-