भाजपाच्या वतीने सेवापंधरवाड्या निमित्त राबविण्यात आले स्वच्छता अभियान..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाड्या अंतर्गत जळगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरभर स्वच्छता अभियान राबविले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले व त्यांनी तेथील सर्व परिसर आपल्या कार्यकर्त्यांसोबत स्वच्छ केला. सदर स्वच्छता अभियान सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारापासून सुरुवात करून तेथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केली. त्यानंतर भीम नगर सिद्धार्थ नगर व पंचशील नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करीत तेथील आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी अभियान प्रमुख प्राध्यापक राजेश गोटेचा,माजी नगराध्यक्ष सीमाताई डोबे, माजी नगराध्यक्ष  रामदास बोम्बटकार, जिल्हा महामंत्री  नंदकिशोर  अग्रवाल, भाजपा शहर  अध्यक्ष अभिमन्यु भगत,राजू हिस्सल, लताताई तायडे, शिल्पा भगत, म्हसाळ ताई, सुरेश  इंगळे, अरुण खिरोड़कार, कैलास  डोबे,सखाराम ताड़े, कैलास  पाटिल, पांडुरंग  मिसाळ,नीलेश शर्मा,अप्पा,करणसींग राजपूत,शाकिर  खान, शुभम  चांडाले, शोएब,आशीष  सारसर,ओंकार वानखड़े, अमोल म्हसाल,अतुल दंडे, सचीन  कल्याणकर,प्रवीण मूळतकर,अमोल भगत, कैलास  सोनोने,शोएब  काजी गणेश  आरुड़कर यासह असंख्य भारतीय  जनता  पार्टी चे  कार्यकर्ते या स्वच्छता अभियानास उपस्थित होते.

Previous Post Next Post