नगरपरिषद चा विरोध करणाऱ्यांनी खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये-किरण सेदानी...


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथे नगरपरिषद होणे शक्य नसून आमदारांकडुन नगरपरिषद चे गांजर नागरिकांना देण्यात आल्याच्या प्रतिक्रिया देउन नगरपरिषदेचा विरोध करणाऱ्यांनी खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे भारतीय जनता पक्षाचे तेल्हारा तालुका उपाध्यक्ष  किरण सेदानी यांनी केले आहे.हिवरखेड येथे नगरपंचायतिची प्राथमिक उद्घोषणा झाल्यानंतर त्यावर स्थगिती आली याचे भांडवल करीत बेंबी च्या देठापासून आमदार प्रकाश भरसाकळे यांचा विरोध करणाऱ्यांनी याचे खापर आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर फोडले एवढ्यावरच न थांबता आमदार भरसाकळे यांना भेटण्याकरिता गेलेल्या सर्व पक्षांचे व सर्व संघटनेच्या शिष्टमंडळाला आमदार भारसाकळे यांनी माझ्यावर विश्वास ठेवा मी हिवरखेड येथे नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर आमदारांनी हिवरखेड वासीयांना नगरपरिषदेचे गांजर दिले दिले असून हिवरखेड येथे नगरपरिषद होणे शक्य नाही त्यामुळे आमदाराने दिलेले नगरपरिषद चे चॉकलेट हिवरखेड वासी गिळनार नाहीत अश्या प्रतिक्रिया देऊन बातम्या सुद्धा प्रसिद्ध केल्या व आमदार प्रकाश भारसाकळे यांना केवळ विरोधासाठी विरोध करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानीक पक्षाचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र नगरपरिषद उद्घोषणा झाल्यानंतर हेच विरोधक  आता आमच्या प्रयत्नामुळेच नगरपरिषच झाल्याचे सांगून खोटे श्रेय लटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस हिवरखेडात वाढतच आहे परंतु "ये जो पब्लिक है ये सब जाणती है" हे या खोटे श्रेय लटणाऱ्यांनि लक्षात ठेवावे असेही  कीरण सेदानी म्हणाले व हिवरखेडला नागरी क्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रणधीर भाऊ सावरकरआमदार प्रकाश भाऊ भारसाकळे  व सर्व हिवरखेड वासियांचे आभार मानून त्याचा हिवरखेड येथील भाजपाचे सर्व पदाधिकारी मिळून समस्त हिवरखेड वासीयांच्या साक्षीने नागरी सत्कार घेण्याचा मानस सुद्धा बोलून दाखविला.

Previous Post Next Post