जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये 6 आॅगस्ट रोजी शैक्षणिक सत्र 2021-22 मधील बीए आणि बीकॉम अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ डाबरे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले.व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीए आणि बीकॉम अंतिम वर्षा ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.महाविद्यालयामधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला, आपल्या गावाचा व देशाचा नावलौकिक वाढवावा, एक सुजाण नागरिक बनवून देश सेवा करावी असे मोलाचे मार्गदर्शन व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात येऊन विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक विप्रदास सर यांनी मानले..
जळगाव येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-