राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांची पक्षाने केली जळगांव (खांदेश) शहर व ग्रामिण जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ति...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात तथा बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची संघटन बांधनी सुरु करण्यात आली आहे असुन काही दिवसां आधीच बुलढाणा जिल्ह्याध्यक्ष तथा कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या. ज्येष्ठते नुसार माजी आमदार रेखाताई खेडेकर यांची जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून घाटाखालील राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांना पक्षाने संघटन बांधनीची जबाबदारी दिली, रेखाताईंच्या सोबतीला घाटावर नरेश शेळके यांना सुद्धा कार्याध्यक्ष करण्यात आले. दिनांक ३/८/२०२३ रोजी आधीच जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेल्या प्रसेनजीत पाटिल यांना जळगांव (खांदेश) शहर व ग्रामिण जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ति प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटिल यांनी करुन त्यांंच राजकीय वजन वाढवण्याच काम केल आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा संघटन वाढ़ीसाठी फायदा करुन घेण्यासाठी त्यांना ही जबाबदारी दिली असुन सोबतच येनार्या काळात पक्षातील नवीन नेतृत्व घडविण्यासाठी पक्षाने ही पावले उचलल्याचे बोलल्या जात आहे.

Previous Post Next Post