आमदार अमोल मिटकरी यांची वारकरी रुग्णवाहिका हिवरखेड मध्ये धावते रुग्णांनच्या सेवेकरिता ,,,,,कित्येक रुग्णांना हिवरखेड वरून आकोला उपचार घेण्यासाठी करते ने आन ही रुग्णवाहिका...


 अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी हिवरखेड...

येथे जेव्हा जेव्हा रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा ,हिवरखेड गावावरून आकोला उपचार मिळावा अशा वेळी विधानपरिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी  हिवरखेडसह परिसरातील रुग्णांनच्या सेवेकरिता वारकरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, आजही ती रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरिता तत्पर आहे, कित्येक रुग्ण या रुग्णवाहिकेचा लाभ घेतात, हिवरखेड गावाकरिताच नव्हे तर तेल्हारा तालुक्याप्रति नेहमीच आमदार मिटकरी यांनी प्रेम, व विकास कामांना गती मिळावि याकरिता आपले कार्य सुरूच ठेवले  व पुढे सुद्धा ते तेल्हारा तालुक्यात त्यांच्या प्रतिनिधीच्या नेमणुकाने कार्य सुरूच ठेवतील अशी सुद्धा आशा त्याच्या प्रति प्रेम असणाऱ्यान जवळून व्यक्त केली जात आहे, तसेच मिटकरी यांनी हिवरखेड गावाला नगरपंचायत, नगरपरिषदचा दर्जा प्राप्त व्हावा याकरिता सुद्धा मोठा लढा सुरू ठेवला, तालुक्यातील पुलाच्या कामाला गती मिळावी याकरिता सुद्धा नेहमी पुढाकार घेतला, अशा विविध स्वरूपाचे कामे त्यांनी मार्गी लावले, हिवरखेड   श्री विठ्ठल रुखमाई संस्थान  मधील वारकरी यांच्या  सहवासात त्यांनी या रुग्णवाहिकाला वारकरी नावं दिले,व आजही वारकरी या नावाने ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत धावते, याबाबत गावात आमदार मिटकरी यांचे शब्द समूहाने  कौतुक केले जात आहे,

Previous Post Next Post