हिवरखेड नजीक दक्षिण दिशेकडे जात असलेले व प्रसिद्ध ठिकाण मानलेले, खारसा , या निसर्गरम्य ठिकानावर निसर्गाने वेगळी चादर ओढल्याने या ठिकाणाला आणखी रंगत आल्याचे दिसून येत आहे, खारसा हे ठिकाण निसर्गानेच नव्हे तर महान ऋषीमुनी ऋषी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाणे भरून आले, प्राचीनकाळी या खारशावर दुधाची धार पडत होती असे सांगितले जाते,,तेंव्हापासून याला धबधबा असे सुद्धा नाव पडले असे भाविक सांगतात, आता या स्थळी मोठ्या स्वरूपात पाणी वाहते, या अधिक श्रावण मासात भाविक या ठिकाणी ऋषी महाराज दर्शन व या तीर्थाचे दर्शन घेण्यासाठी येतात,तसेच या धबब्यात एक डुबकी लावून गंगासागरचा भास व्यक्त करतात, या स्थळी अमूर्तकुंड म्हणून बाराही मास वाहणारा झिरा आहे, मोठं मोठे वटवृक्ष आहेत, फुलांनी सजलेला बगीच्या , वाहतो तो झरा, आसरा माता मंदिर, शिवलीग, गुफा,आधी अनोखे देखण्या स्वरूपाचे नैसर्गिक शांत,सूंदर वातावरण या खारसा धार्मिक स्थळी पाहण्यास मिळते, भाविक आजही ऋषी महाराज यांच्या दर्शनाल येऊन अनुभव दर्शवतात, या मार्गावरील रस्ता शासनानी दुरुस्त करावा, जेणेकरून भाविकांनसाठी सोइचे होईल व आणखी भाविक या स्थळी दर्शनाचा लाभ घेतील, शासनाने या स्थळाला कडे लक्ष द्यावे अशी सुद्धा मागणी भाविक करीत आहेत.
हिवरखेड धबधबा खारसा निर्सगात विलीन,खारशाला निसर्गासह ऋषी महाराजांची देणं,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...