तालुक्यातील पळशी वैद्य आणि पळशी घाट या गावाला २२ जुलै च्या महापुराने वेढा घातला होता. संपूर्ण गावात पाणी शिरले होते. पुराने बाधित झालेली आहेत. गाव शिवारातील सर्व शेती पाण्याखाली गेली होती.त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जिगाव धरणाचे बॅक वॉटर, पाण्याची तुंबही पळशी घाट ,वैद्य शिवाराच्या पर्यंत पोहोचली आहे. तरीसुद्धा जिगाव प्रकल्प अभियंता यांनी हे गाव धरणग्रस्त म्हणून घोषित केले नाही. कुठलाही धरणग्रस्त म्हणून लाभ या गावाला मिळाला नाही. ही सर्व गावकरी आपले घरदार सोडून इतरत्र राहायला जायला तयार आहेत. ह्या दोन्ही गावांना शासनाने प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करावे अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वार्धावर दिनांक १४ ऑगस्ट रोजी पळशी वैद्य आणि पळशी घाट या गावातील संपूर्ण नागरिक हे आपल्या गावातच आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिगाव धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल भोपळे, सचिव सुरेश तुरक यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. २२जुलै च्या अतिवृष्टी व महापुरात संपूर्ण गावे आणि शिवार सुद्धा पाण्याखाली आले होते. त्यामुळे या गावाकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. ह्यासाठी तमाम गावकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे .सदर निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे सह जिल्हाधिकारी आणि जिगाव प्रकल्प ,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग खामगाव तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना देण्यात आल्या आहेत.
धरणग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी पळशी घाट/ वैद्य ग्रामस्थांचे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वार्धावर आमरण उपोषण...
जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-