जिल्ह्यामध्ये अवैधरित्या व विनापरवाना गौणखनिज रेती वाळूची होणारी वाहतूक, साठवणूक आणि रेतीची चोरटी विक्री करणारे इसमाचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैधरित्या व विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या,सदर अनुषंगाने (1) दि. 23/09/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय खबरेवरून पो.स्टे. नांदूरा हद्दीत अवैध व विनापरवाना गौण खनिज वाहतूक संबंधाने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आरोपी (1) विठ्ठल मधुकर निंबाळकर रा. नांदूरा हा त्याचे ताब्यातील अशोक लेलैंड कंपनीच्या टिप्परमध्ये 2.5 द्वारा रेतीची विनापरवाना व अवैधरित्या चोरटी वाहतूक करतांना मिळून आला. नमुद आरोपी याचे कडून 2.5 ब्रास रेतीसह, एक अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर असा 25,15,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमुद आरोपी तसेच टिप्परचा मालक यांचे विरुद्ध पो.स्टे. नांदूरा येथे भादंविचे कलम 379, 34 प्रमाणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. नांदूरा करीत आहेत.तसेच (1) दि. 24/09/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय खबरेवरून पो.स्टे. शेगांव (शहर) हद्दीत अवैध व विनापरवाना गौण खनिज वाहतूक संबंधाने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आरोपी (1) देवानंद विलास पहुरकर रा. शेगांव हा त्याच्या ताब्यातील आवशर 2110 कंपनीच्या टिप्परमाये 2 ब्रास रेतीची विनापरवाना व अवैधरित्या चोरटी वाहतूक करतांना मिळून आला. नमुद आरोपी यांचे कडून 2 ब्रास रेतीसह, एक आयशर 2110 कंपनीचा टिप्पर असा 20,20,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर प्रकरणी चालकासह वाहनाचा मालक यांचे विरुध्द पो.स्टे. शेगांव (शहर) येथे भादंविचे कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात असून पुढील तपास पो.स्टे. शेगांव शहर पोलीस करीत आहेत.वरील प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथकाने दि. 23.09.2023 आणि दि. 24.09.2023 रोजी रेती चोरी संबंधाने 02 वाहनांना पकडून 04 आरोपी विरूद्ध कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 45,35,000/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. सदरची कारवाई सुनिल कहासने पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये तर अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी, अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि स्वप्निल नाईक, निलेश सोळंके, पोहेकॉ राजेंद्र अंभोरे, अरुण हेलोडे, पंकज मेहेर, पांना गणेश पाटील, पोकॉ दिपक वायाळ, जयंत बोचे, विजय सोनोने, विक्रम इंगळे पापोना, रवि मिसे, पापोकॉ. विलास भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली.
रेती चोरी करणाऱ्या 02 आरोपीसह 02 टिप्पर नांदूरा व शेगांव हदीत पकडले. स्था. गु.शा. ची कारवाई 04 आरोपी विरुद्ध गुन्हा तर टिप्पर-02 रेती वाळू 4.5 बास असा एकूण 45.35,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...
गणेश भड/उपसंपादक RC24 न्युज...
