मेळघाट हा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.मेळघाटातील वन संपत्तीची जतन व सुरक्षा करण्यासाठी दर महिन्याचे लाखो रुपये खर्च करून शासनाने वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वन कर्मचाऱ्यासोबत दर तीन महिने करिता रोजंदारी मजूर कामावर ठेवले जाते.चिखलदरा तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभाग जारीदा परीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खंडूखेडा वर्तुळातील घाना जंगलात जंगल गस्तीवर असलेल्या एका रोजंदारी मजुरांवर अस्वलीने हल्ला केला.घाना येथील रहिवासी गणाजी गुणू अखंडे वय ३५ वर्ष हा रोजंदारी मजूर म्हणून कामावर आहे.सकाळी जंगल गस्त करीता रावजी अखंडे वनपाल,भोगेलाल मावस्कर रोजंदारी मजूर,गणाजी गुणू अखंडे रोजंदारी मजूर,निघाले होते.जंगल गस्त करीत असतांना वनखंड क्रमांक ३०० मध्ये सकाळी आठ च्या सुमारास अचानक गणाजी अखंडे रोजंदारी मजूर यांच्या वर अस्वलीने हल्ला चढविला .या हल्ल्यात गणाजी अखंडे गंभीररुपे जखमी झाला. जखमी अवस्थेत उपचाराकरिता रावजी अखंडे वनपाल यांनी ग्रामीण रुग्णालय चुरणी उपचाराकरिता दाखल केले.ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय अमरावती येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. अखंडे यांच्या डोक्याला मोठया प्रमाणात इजा झाली असून रक्त शुद्ध मोठया प्रमाणात शरीरातून गेले आहे.मेळघाटात अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांवर अस्वलीचे हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.नागरिकांनी जंगलात किंवा शेतात जातांना आपली काळजी घ्यावी. जेणेकरून जंगली जनावरांपासून होणाऱ्या हल्ला पासून स्वतःहा चा बचाव करता येईल.गणाजी अखंडे रोजंदारी मजूर यांच्यावर डॉ.धुर्वे व डॉ.मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय चुरणी येथील आरोग्य कर्मचारी सचिन भाऊ खंडारे,नरेन्द्र पंडोले यांनी यशस्वीरीत्या उपचार केला आहे.जखम जास्त असल्याने पुढील उपचाराकरिता जखमीला जिल्हा रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात येणार आहे.
आदिवासी रोजंदारी मजुरांवर अस्वलीचा हल्ला- जंगल गस्ती दरम्यान वर्तुळ घाना येथील घटना...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...