नदीपात्रातून जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करून द्यावी.. नागरिकांची मागणी..आसलगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनावर आक्रमक....


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

22 जुलै रोजी आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने संग्रामपूर तसेच जळगाव जामोद तालुक्यामधील नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे.   अनेक नद्यांवरील पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत होवून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मुख्य मार्गावरील आसलगाव नदीवरचा निर्माणाधीन पूल पाण्यामध्ये वाहून गेला आहे.  त्याच सोबत आसलगाव गावांमध्ये जाण्यासाठी एक पूल आहे तर दुसऱ्या बाजूने वार्ड नंबर एक आणि दोन मधून मोठे गाव म्हणजेच वार्ड  नंबर ३ आणि ४  मध्ये जाण्यासाठी हि नदी पार करावी लागते... या ठिकाणी  नदीवर कोणताही पूल नाही.. प्रसंगी पुराचे पाणी आल्यास किंवा धरणाचा सांडवा सुरू झाल्यास नदीतून पाणी वाहत राहते.. यावर्षी आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी खूप खोल झाली असून आज रोजी खूप मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून सांडवा सुरू आहे. त्यामुळे वार्ड नंबर एक आणि दोन मधील शाळेतील मुलं व ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेवून पायी नदी पार करावी लागते... या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात  20 सप्टेंबर रोजी वार्ड क्रमांक एक आणि दोन चे नागरिकानी आसलगाव चे सरपंच व उपसरपंच यांना निवेदन देवून येणाऱ्या काळात लवकरात लवकर नदीमधून जाण्यासाठी पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था करून द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Previous Post Next Post