बुलढाणा जिल्ह्यात ओबीसी जागर यात्रेचे जोरदार स्वागत.डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर यात्रा...

अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...

संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेतर्फे बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंपर्क साधून सभा घेण्यात आल्या. जनसंपर्काच्या माध्यमातून ओबीसी जागर यात्रेचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांच्या आयोजनात आणि कुशल नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे.जळगाव (जामोद) येथे आयोजित भव्य सभेत डॉ. आशिष देशमुख म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी ज्या योजना आणल्या आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात म्हणून २ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी जागा यात्रा महाराष्ट्र पालथी घालायला निघाली. या यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सरकारने ४००० कोटी रुपयांची तरतूद ओबीसींसाठी केली आहे. ओबीसी महामंडळाची स्थापना, युवक-युवतींना शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, वैद्यकीय शिक्षणात आरक्षण अशा अनेक योजना सरकारने आणल्या आणि ओबीसींच्या प्रगतीला चालना दिली. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून ओबीसी समाजाच्या प्रत्येक लहान घटकांची आर्थिक उन्नती होणार आहे. आजपर्यंत सेतू ऑनलाईन पोर्टलवरून १५ लाख नोंदण्या झाल्या आहेत. कॉंग्रेसने ओबीसींच्या विभाजनाचं काम केलं. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली. ओबीसी समाज एकत्रित व्हावा आणि त्याची ताकद दिसावी, ही भाजपाची इच्छा आहे. १२ बलुतेदारांसाठी अनेक योजना आणून भाजपा ओबीसींना एकत्रित आणण्याचे काम करीत आहे. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनीच ओबीसी समाजाचे खरे कल्याण केले. त्यांनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला आणि श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले. राज्याचे पहिले ओबीसी मंत्री बनण्याचा मान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) विधानसभा क्षेत्राचे डॉ. संजय कुटे यांना मिळाला. आपल्या विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना परत मंत्रिमंडळात स्थान मिळावे जेणेकरून बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसींच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, अशी विनंती उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना करणार आहे.” डॉ. आशिष देशमुख यांनी ओबीसी समाजाच्या अनेक लहान व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना विश्वकर्मा योजनेची माहीती दिली.त्यांनी जळगाव (जामोद) येथे आयोजित एका पत्रपरिषदेत देखील पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी संजय गाते- अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, अर्चनाताई डेहनकर- प्रदेश महामंत्री ओबीसी मोर्चा, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, ढोकणे, गजानन कोल्हे, शालिनीताई बुंदे, विशालजी गणगणे, अपर्णा कुटे, शाकीर खान, मुरली राऊत, गव्हाणकर व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिषराव र. देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष  संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.ओबीसी जागर यात्रेची सुरुवात ०२ ऑक्टोबर २०२३ ला हिंगणघाटपासून झाली असून यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे १३ ऑक्टोबर २०२३ ला होईल. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले आहे.

Previous Post Next Post