सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी....
अकोट दि.२ नोव्हेंबर गुुरुवार रोजी अकोट येथील स्थानिक विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठाकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुसुधून कुलथे,राजु भास्करे,राज्य कार्यकरणीचे सौय्यद शकील,यांची उपस्थिती लाभली होती.संस्थेचे अध्यक्ष यांनी पक्ष संघटना कशी वाढेल,संघटनेच्या अटी काय संघटना म्हणजे काय या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या नंतर विविध पदाची नियुक्ती करण्यात आली.अकोला जिल्हाअध्यक्ष म्हणून देवानंद खिरकर,जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अनिल वागारे,अकोट तालुका अध्यक्ष म्हणून गणेश वाकोडे,शहर अध्यक्ष म्हणून अकबर खान,महिला अकोला जिल्हाअध्यक्ष म्हणून लक्ष्मी गावंडे, यांचीसर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी अली सर,मो. जुबेद,गणेश सोनटक्क,सौ.नूर,जफर खान,रुख्मा संतोष घुगे,प्रवेज खान,वसीम सर यांची उपस्थिती होती...