भरधाव वेगात असलेल्या क्रियेटा कारणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन महिलांना चिरडले.यामध्ये माय लेकीचा मृत्यू तर एक वृध्दा जखमी...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील संजय गांधी सहकारी सूतगिरणी जवळील टर्निंग रोडच्या कडेला उभ्या असलेल्या तीन महिलांना भरधाव वेगात आलेल्या क्रियेटा कारणे चिरडले या झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू व एक महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची घटना आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी साडेतीन वाजे दरम्यान घडली. सविस्तर असे की शेतीची कामे आटोपून ह्या तीन महिला रस्त्याने घरी जात होत्या. सूतगिरणी जवळील असलेल्या मोठ्या वळणावर ह्या तीन महिला उभ्या असताना नांदुरा येथून भरधाव वेगात येत असलेल्या क्रियेटा गाडी क्रमांक एम एच 28 ए झेड 3997 च्या गाडी चालकाने या तीन महिलांच्या अंगावर गाडी नेऊन चिरडल्याने या तीनही महिला गंभीर रित्या जखमी झाल्या. घटनास्थळी ॲम्बुलन्स घेऊन रुग्णसेवक उल्हास माहोदे यांनी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले. रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यामधील मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एका महिलेला खामगाव येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले. नंदाबाई महादेव दांडगे वय पन्नास वर्ष व मुलगी वैष्णवी महादेव दांडगे वय 17 वर्षे या मायलेकीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर बेबाबाई लक्ष्मण घोपे ह्या गंभीरित्या जखमी झाल्या या तिन्ही महिला आसलगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. बेबाबाई यांना ग्रामीण रुग्णालयाचे प्राथमिक उपचार करून खामगाव येथे रेफर करण्यात आले. या अपघातास कारणीभूत ठरलेली क्रियेटा गाडी ही नांदुरा येथील मनोहर शेठ मियानी यांची असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या अपघातात या घटनेचा तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post