वंचित चे एकदिवसीय लाक्षणिक चटणी भाकर आंदोलन..!


 जळगाव (जा)प्रतिनिधी:- 

वंचित बहूजन आघाडीचे दि:-१२/११/२०२३ ला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय 'लाक्षणिक चटणी भाकर आंदोलन' जळगांव जामोद तालुक्यात महापूर येऊन शंभर  दिवस उलटूनही अद्याप पूरग्रस्त शेतकरी नागरिकांना आर्थिक मदत मिळालेली नाही या महापुरामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली, अनेक नागरिकांचे घरे पुरात वाहून गेले, गुरे ढोरे वाहून गेले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, अनेकांवर आत्महत्येची वेळ आली आहे, परंतु अद्यापही पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक रूपयाची सुद्धा मदत दिली नाही दिवाळी आधी या 'तिघाडी सरकारने' शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन बेघरांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही मदत दिली नाही. पूरग्रस्तांना पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळणाऱ्या या सरकारचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निषेध म्हणून एकदिवसीय 'लाक्षणिक चटणी भाकर आंदोलन' करण्यात येणार आहे असे  निवेदनात म्हंटले आहे  निवेदन देतेवेळी मा.ता.अध्यक्ष रतन नाईक, तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे, विजय तायडे, गुलाबराव आठवले, नितीन वानखडे  नरेंद्र पवार आदीं उपस्थित होते.

Previous Post Next Post