सहकार विद्या मंदिर जळगाव जा. येथे शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र मंजूर...एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांची वणवण संपली...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला शासकीय रेखा कला परीक्षेच्या केंद्रास मान्यता मिळाली आहे....महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळा च्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला परीक्षेसाठी दरवर्षीच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील हजारो विद्यार्थी प्रविष्ट होत असतात.... परंतु या दोन्ही तालुक्यांमधून संग्रामपूर हे एकच परीक्षा केंद्र असल्याने या केंद्रावर जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे.... विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात भौतिक सुविधांची कमतरता भासत असल्याने या वर्षीपासून ही परीक्षा घेण्यास संग्रामपूर येथील श्री संत गुलाब बाबा विद्यालयाने नापसंती दर्शवली होती.... त्यामुळे एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.... जळगाव जामोद शहरातील इतर कोणत्याही शाळा या परीक्षेचे केंद्र घेण्यास इच्छुक नसल्याने बुलढाणा अर्बन चे संचालक डॉक्टर किशोर केला आणि मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या दूर केली आहे... सहकार विद्या मंदिर मध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शैक्षणिक सत्र 2024- 25 पासून शिक्षण विभागाच्या वतीने शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र शाळेला दिले आहे..... यासाठी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, प्रा. अमित धूत व कला शिक्षक सुनील हागे यांनी पाठपुरावा केला.....यामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली असून पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे....