पातूर्डा जि.प. सर्कलमध्ये भुमिपूजन-निरीक्षण व लोकार्पण सोहळा आ.डॉ. कुटे यांच्या हस्ते संपन्न...
सागर कापसे/संग्रामपूर...
जळगाव जामोद विधानसभा म तदार संघात माजी कामगार मंत्री तथा विद्यमान आ. डॉ. संजय कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंधारण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रादेशीक पर्यटन, ब दर्जा तिर्थक्षेत, अल्पसंख्यांक विकास, मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना, इत्याादी योजनांमधुन सामाजीक सभागृह, अंगणवाडी बांधकाम, जि. प. शाळा बांधकाम, आरोग्य केंद्र बांधकाम, रस्ते बांधकाम, स्मारक बांधकाम, पुतळा सौंदर्याकरण व प्रगती पथावरील मंजुर विकास कामांनी वेग घेतला आहे. आज ७ ऑक्टोबर रोजी आसलगाव व पातुर्डा जि.प. सर्कल मधील १२९ कोटी रुपयांच्या कामांचा भुमिपुजन निरिक्षण व लोकार्पण सोहळा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये आसलगांव जि.प. सर्कल मधील गाडेगांव खुर्द, अकोला खुर्द, सावरगांव, आसलगांव, सुलज, धानोरा, भिंगारा, चारबन, हनवतखेड, वडगांव गड हाशमपुर, उमापुर, पातुर्डा जि.प. सर्कल, वानखेड, दुगौदैत्या, मनार्डी, उकळगांव, कळमखेड, जस्तगांव, सावळी, वरवट खंडेराव, खिरोडा, उकळी, कोद्री, आस्वंद, आवार, टाकळी पंच, पातुर्डा खुर्द, पातुर्डा बु. देऊळगांव येथील विकास कामांचा समावेश आहे पातुर्डा बु. येथील बालाजी मंदिर येथे कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ गणेश दातीर, भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भारत वाघ, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गजानन दाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, केशव ढोकणे, जिल्हाचिटणीस प्रमोद गोसावी, माजी जि प ज्ञानदेवराव भारसाकडे, प्रदीप भुतडा, वसुभाऊ सवडतकर, सुधीर लव्हाळे, सचिन अग्रवाल, विठ्ठल वाघ, सुभाष हागे, रमेश खोकले प्रकाश गोतमारे विठल गव्हाडे शिवशंकर गाळकर, आत्माराम वरटकार , या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
