श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशनची अनाथ मुलांसोबत दिवाळी.नवीन कपडे आणि फराळ देऊन फुलविले अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य...


 
श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशनची अनाथ मुलांसोबत दिवाळी.नवीन कपडे आणि फराळ देऊन फुलविले अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

जळगाव जामोद मतदार संघात आपल्या सेवाकार्याने सतत कार्यरत राहून श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मतदार संघातील अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारत नवीन कपडे आणि फराळ देऊन अनाथ मुलांची दिवाळी गोड केली आहे... यावर्षी आचारसंहिता असल्यानं आमदार डॉ. संजय कुटे यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करत स्वतः अनुपस्थिती दर्शवली. पण कार्यकर्त्यांकरवी परंपरा मात्र जोपासली. दिवाळीला स्वतःच्या घरचा दिवा लावण्याआधी सकाळी दहा वाजता जगदंबा देवी संस्थान लाडनापूर येथे अनाथ मुलांच्या आयुष्यात आशेचा नंदादीप उजळवला.. यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांचे स्विय सहाय्यक प्रकाश राऊत, यांचेसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते..

Previous Post Next Post