शिवसेनेने घातले संत गजानन महाराज चरणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे याकरिता साकडे...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे.आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्व महाराष्ट्रतील जनतेचे लक्ष लागून आहे.मागील अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात केली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद देण्यात यावे यासाठी विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराज मंदिर शेगांव येथे शिवसेनेच्या वतीने संत गजानन महाराज यांना साकडं घालण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, किसान सेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ वाघ, उपजिल्हा प्रमुख अशोक टावरी, सौ.शारदाताई खानझोड महिलासेना जिल्हाप्रमुख, जयश्री देशमुख खामगाव महिला सेना तालुका प्रमुख,, राहुल मारोडे उपजिल्हा, प्रमुख,शेगांव तालुका प्रमुख रामा थारकर , खामगाव तालुका प्रमुख राजेंद्र बघे, संग्रामपूर तालुका प्रमुख केशव ढोकणे, संजय पाटील खोंड उप तालुका प्रमुख संग्रामपूर,शेगांव शहर प्रमुख संतोष लिप्ते, अरुण ताडे, उल्हास पाटील,कैलास कडाळे विधानसभा संघटक जळगांव जा, अंकुश कड, युवासेना तालुका प्रमुख उमेश शेळके, अमोल दाभाडे युवासेना तालुका प्रमुख जळगांव, शत्रुघ्न पाटील उगले, अनंता झालटे, विजय सित्रे, रवीभाऊ रावणकर यांच्यासह शिवसेना, युवासेना , महिलासेना व सर्व आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.