स्वातीताई ला आमदार करण्यासाठी आघाडीच्या सर्व नेत्यांनी एक दिलाने काम करावे काँग्रेस महासचिव मुकुल वासनिक...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
स्वातीताईला आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांची एकदिलाने काम करावे लागेल तरच स्वातीताई या मतदारसंघाचे आमदार होतील ,असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारादरम्यान पिंपळगाव काळे येथे ठेवलेल्या आढावा बैठकीदरम्यान व्यक्त केले....पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या जळगाव जामोद मतदार संघाचे वातावरण आपल्यासाठी अनुकूल असून मला विश्वास आहे आपण स्वातीताईला यावेळेस आमदार केल्याशिवाय राहणार नाही स्वातीताई जशा काँग्रेसच्या आमदार राहतील तशा त्या शिवसेना उबाठा गटाच्या तशाच त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तशाच त्या आरपीआय गवई गटाच्या आमदार राहतील. स्वातीताई आमदार झाल्यावर स्वातीताई वर जेवढा आमचा अधिकार राहील तेवढाच अधिकार प्रसेनजीतदादा पाटील, प्रकाश पाटील व राहील तेवढाच अधिकार प्रशांत तायडे यांचा राहील,असे सांगितले ,पिंपळगाव काळे येथे सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारा निमित्त पार पडलेल्या आढावा बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक बोलत होते.काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे जळगाव जामोद मतदार संघातील सर्कलनिहाय आढावा बैठकीच्या दौऱ्याचे आयोजन केले होते.सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरने मुकुल वासनिक यांचे सातपुडा कॅम्पस मध्ये आगमन झाले असता कृष्णराव इंगळे,रामविजय बुरुंगले,उमरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.त्यानंतर जळगाव शहर व आसलगाव, वडगाव गड येथे सुद्धा मुकुल वासनिक यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले....यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, एक वेळ असा होता की जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये सर्वात जास्त मतदान जलंब व मेहकर विधानसभा मतदारसंघात स्पर्धा व्हायची. कधी जलंब तर मेहकर मध्ये काँग्रेसला जास्त मतदान व्हायचे. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली .त्यामुळे यावेळेस सुद्धा आपल्या मतदारसंघात काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यावे लागेल. हे सत्ताधारी बाळासाहेबांचे नाव घेतात शिवरायांचा पुतळा बसवतात पण तो आठ महिन्यात कोसळतो याला जबाबदार इथला कॉन्ट्रॅक्टर नसून इथला आर्किटेक्टर नसून त्याला जबाबदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आमचा अभिमान आहे आणि या अभिमानाला तुम्ही जर धक्का पोहोचवत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे आपल्याला या महाराष्ट्रात यांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणायचा आहे. असे मत व्यक्त केले.यावेळी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रसेंजित पाटील, माजी आमदार कृष्णराव इंगळे, रामविजय बुरुगले, प्रकाश पाटील,डॉक्टर राजपूत, गजानन वाघ, तुकाराम काळपांडे,समाधान दामधर, यांच्यासह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
