स्व.यमुनाबाई शंकरराव बानाईत यांच्या स्मृतिप्रत्यर्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप...


 स्व.यमुनाबाई शंकरराव बानाईत यांच्या स्मृतिप्रत्यर्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सातबारा हॉटेलचे संचालक रमेश बानाईत यांच्या मातोश्री स्वर्गवासी यमुनाबाई शंकरराव बानाईत यांच्या आठव्या स्मृती पित्यर्थ दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत, विजय वंडाळे, पांडुरंग गवई, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, डॉक्टर शालिकग्राम कपले, पत्रकार अनिल भगत, माजी सरपंच अयुब तळवी,पत्रकार विनोद वानखडे, सुनील गवई, शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे सर, अनिल वसुले, श्रीराम मिसाळ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर मॅडम यांनी केले तर आभार शाळेच्या शिक्षिका साबे मॅडम यांनी मानले. यावेळी शिक्षक बेग सर यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना लेटर व पेन यासह खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर सर, साबे मॅडम, शिक्षक जाफर बेग,बोंबटकर मॅडम, गवई मॅडम,घुले मँडम, उमाळे मँडम,स्वाती वसुले, मनोहर वानखडे,राजु अंदुरकार व शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post Next Post