वंचितचे डॉ. प्रवीण पाटील यांच्या प्रचारात मतदारांचा वाढता प्रतिसाद ..जळगाव मतदार संघातील ग्रामीण भागात वंचितला वाढती पसंती...


 वंचितचे डॉ. प्रवीण पाटील यांच्या प्रचारात मतदारांचा वाढता प्रतिसाद ..जळगाव मतदार संघातील ग्रामीण भागात वंचितला वाढती पसंती...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे ......नुकत्याच काही दिवसांपूर्वी मतदार संघामध्ये वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली.. त्या सभेच्या माध्यमातून मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे ...आपल्या निवडणूक प्रचार दौरा निमित्ताने 12 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील निरोड, बोडखा, भिलखेड, काकोडा, चोंडी, टाकळेश्वर,इटखेड, पेसोडा,  कुंभारखेड, भोन,हिंगणा, सावळी, वरवट खंडेराव, खिरोडा, उकडी, आवार, टाकळी पंच, पातूर्डा खुर्द, वानखेडे आणि दुर्गादैत्य या गावांमध्ये जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत निवडणूक प्रचार रॅली काढली.... या गावातील नागरिकांनी  उत्स्फूर्तपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवित डॉक्टर प्रवीण पाटील यांना विजयाची हमी दिली आहे...

Previous Post Next Post