भगिनींच्या या प्रेमापोटी मी भारावलो- आ.संजय कुटे...पिंपळगाव काळे सर्कलमधील शेकडो महिलांनी केली भाऊबिज साजरी...


 
भगिनींच्या या प्रेमापोटी मी भारावलो- आ.संजय कुटे...पिंपळगाव काळे सर्कलमधील शेकडो महिलांनी केली भाऊबिज साजरी...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

निवडणूक प्रचारादरम्यान गावोगावीच्या महिलांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांचे आपापल्या घरासमोर येवून औक्षण करत भाऊबिज साजरी केली.महिला भगिनीच्या प्रेमापोटी मी भारावून गेलो असून भगिनींच्या सुख दुःखात सदैव पाठीशी असल्याचे आ डॉ.संजय कुटे यांनी यावेळी शब्द दिला. आपल्या गावात आ संजय कुटे येणार म्हणून महिलांनी आपापले घरकाम,शेतातील कामे आटोपून आ डॉ.संजय कुटे यांचे सोबत भाऊबिज साजरी करण्यासाठी आधीच तयारी करून ठेवली होती.गावा गावातील शेकडो महिलांनी ओवाळणी करून भाऊबिज साजरी करतांना महिला भगिनींचा उत्साह पाहण्यासारखा होता.एक लोकप्रतिनीधी आणि या ताईंचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिल अशी भावना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केली.प्रत्येक गाव खेड्यात शासनाच्या विकासाची योजना पोहोचून प्रत्येकाला लाभ मिळवून देण्यासाठी आ डॉ.संजय कुटे यांनी सातत्याने प्रयत्न केले.मतदार संघातील गाव खेड्यातील कोणीही शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी त्यांची सतत तळमळ असते. आ. संजय कुटे यांच्या सहकार्यामुळेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचे यावेळी महिलांनी आवर्जून सांगितले.काल मंगळवारी पिंपळगाव कामे सर्कल मधील माहुली,मानेगाव, टाकळी पा.गोळेगाव, हूरसाळ,टाकळी खासा, हिंगणा नवे,गोळेगाव नवे,हिंगणा जुने,गोळेगाव जुने,दादुलगाव नवे, खांडवी,दादुलगाव जुने,झाडेगांव गौलखेड या गावांना काल आ डॉ.संजय कुटे यांनी भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधत मतदानरूपी आशिर्वाद देण्याचे आवाहन केले. प्रचार दौर्‍यात श्रीराम पाटील, प्रकाश वाघ, गुणवंतराव कपले, शांतारामजी दाणे, रंगराव देशमुख, डॉ. किशोरजी  केला, मुरलीधर राउत, वामनराव खाळपे, विलास सुरळकार, वाल्मिकराव ठाकरे, परीक्षित ठाकरे, रामरतन चोपडे, भास्कर पिसे, सुनील गव्हाळे, रवींद्र पाचपोर, डॉ. रवींद्र उगले, डॉ.राजेंद्र तानकर, देवेंद्र भैय्या, भास्कर राउत, रामेश्वर राउत, मोहन गई, शिवचरण घ्यार, एकनाथ वनारे, बाळू पाटील, अभिजित अवचार, रमेश पाटील, पांडुरंग बावस्कर, निलेश खाळपे, मंगेश बाठे, श्रीकृष्ण भेलके यांच्यासह महायुतीचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post