जळगांव जामोद मतदार संघात डॉ. संजय कुटे यांनी आणली आरोग्य सेवा गावपातळीवर !शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचत आहे आरोग्य सेवाचा लाभ -डाॅ मोहन बानोले...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
घरामध्ये एक व्यक्ती डॉक्टर असेल तर तो पूर्ण परिवाराची काळजी घेतो. आपल्या परिवाराचे आरोग्य कशाप्रकारे निरोगी राहील, परिवारात जर कोणी सदस्य आजारी असेल तर त्याच्या निदानासाठी प्रयत्नशील असतो, कोणाला कुठला गंभीर आजार होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देतो. असाच डॉक्टर व्यक्ती या मतदार संघाला लाभल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात गाव पातळीवर आरोग्य सेवा पुरवण्याचे ध्येय डॉक्टर संजय कुटे यांच्या माध्यमातून साकार होताना दिसत असल्याची माहिती प्रसिद्ध डॉ.मोहन बानोले यांनी दिली.मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी करीत असताना श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या मार्फत अविरत आरोग्य सेवा कार्य सतत सुरु आहे. यासोबतच शासकीय आरोग्य यंत्रणा सुद्धा बळकट करण्याचे काम संजयभाऊ सतत करीत असतात त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज आदिवासी बहुल मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये अत्याधुनिक असे डायलीसीस केंद्र निर्माण झाले आहे, ज्यामध्ये दररोज शेकडो किडनी आजारग्रस्त रुग्ण मोफत उपचार घेत असतात.डॉ. संजय कुटे यांनी विधानसभेमध्ये आरोग्य बाबत प्रश्न उपस्थित करून रुग्ण सेवेकरिता आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी जळगाव जामोद येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय शासनाकडून मंजूर करून घेतले व त्यासाठी इमारतीच्या बांधकामाला सुमारे ८० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला असून लवकरच याचे काम सुरु होणार आहे.आरोग्य सेवा दर्जेदार असली पाहिजे व सर्व आजारांचे निदान व उपचार माझ्या नागरिकांना मतदारसंघातच मिळावे यासाठी संजूभाऊंनी अथक प्रयत्न करत केंद्रीय मंत्री मा.ना. प्रतापराव जाधव साहेब व राज्य शासनामार्फत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जामोद येथे खेचून आणले व याकरिता 500 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून घेतला, याही पुढे जात मंत्री ना. जाधव साहेब यांच्या माध्यमातून शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, पॅरा मेडिकल कोर्सेस व नर्सिंग महाविद्यालय आपल्या जळगाव जामोद मतदारसंघात सुरु करण्याचा संजूभाऊंचा मानस आहे.ज्यावेळी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जामोद येथे सुरू होईल तेव्हा त्याचा फायदा स्थानिक गरजू आणि शेवटच्या घटकाला होणार आहे. आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या निमित्ताने अनेक नामवंत प्राख्यात डॉक्टर तज्ज्ञ मंडळी जळगाव जामोद येथे येणार आहे मोठमोठ्या आजारांचे निदान आता नागपूर, पुणे, मुंबईच्या जागी आपल्या शहरांमध्ये होईल हे ध्येय घेऊन आज डॉक्टर संजय कुटे अविरत रुग्णसेवा मतदारसंघातील जनतेला देत आहे.
●स्व श्रीराम कुटे गुरूजी फाउंडेशनचे आरोग्य सेवेसाठी भरीव कार्य...
डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापित केलेल्या श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन मार्फत विविध समाज उपयोगी विशेषत्वे रुग्णसेवेचे उपक्रम राबविण्याचे काम सतत सुरु आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून, मतदारसंघातील सुमारे अडीज हजार रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत, १०० क्षय रुग्णांना व २५० कुपोषित बालकांना दत्तक घेवून त्यांच्या औषध व पोषण आहाराची मोफत व्यवस्था संजूभाऊंच्या मार्गदर्शनात सुरु केल्यानंतर त्यातील 200 पेक्षा जास्त बालके हे कुपोषणाच्या आजारातून बाहेर पडले "यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही माझ्यासाठी नाही" अशा भावना संजुभाऊ व्यक्त करतात.सोबतच, १३०० अनाथ मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना नवीन कपडे व फराळ वाटप करून दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत असतात. या मुलांना शासनाकडून दरमहा बावीसशे रूपये अनुदान सुरू आहे, मतदारसंघातील सर्व शाळांमधील पहिली ते दहावी वर्गातील सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या गेली आणि त्यातून निदान झालेल्या १२०० विद्यार्थ्यांना चष्मे वाटप आदी उपक्रम राबवले जातात. यासर्व कार्यावर संजुभाऊंचे बारकाईने लक्ष असते.
